चीपी विमानतळ येथे वन्यप्राणी यांची ओळख व त्यांचा अधिवास बाबत चर्चासत्र संपन्न.

चीपी विमानतळ येथे वन्यप्राणी यांची ओळख व त्यांचा अधिवास बाबत चर्चासत्र संपन्न.

वेंगुर्ला.

  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील चीपी विमानतळ येथे चिपी विमानतळ प्राधिकरण, वनविभाग सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने “सिंधुदुर्ग विमानतळ” कार्यरत फिल्ड स्टाफ यांना वन्यप्राणी यांची ओळख, त्यांचा अधिवास, याबाबत चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. मुख्य अतिथी म्हणून सावंतवाडी वनविभाग मानद वन्यजीव रक्षक नागेश दप्तरदार उपस्थित होते.
   सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळणाऱ्या पक्षी, प्राणी,सरपटणारे प्राणी यांची चित्रफित दाखवून उपस्थित फिल्ड कर्मचारी अधिकारी यांना माहिती देण्यात आली तसेच मनु श्रीवास्तव यानी“सिंधुदुर्ग विमानतळ” परिसरात आढळणाऱ्या पक्षी, प्राणी व सरपटणारे प्राणी यांची माहिती देवून प्रत्येक महिनाप्रमाणे डेटा सादर केला.त्यानंतर विमानतळ परिसरात आढळणारे कोल्हा,माकड, सरपटणारे प्राणी यांचा अधिवास,त्यांचे अन्नसाखळीतील महत्व विषद केले. त्याचबरोबर सदर प्राण्याकडून विमानतळ धावपट्टीवर येण्यापासून रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना सांगण्यात आल्या.कुडाळ वनक्षेत्रपाल संदीप कुंभार यांनी वन्यप्राणी यांना कायदाद्वारे असलेले संरक्षण व वन्य प्राणी- मानव संघर्ष रोखण्यासाठी वनविभाग करत असलेल्या उपाययोजना बाबत माहिती देवून कार्यरत रेस्कू पथकामार्फत होत असलेल्या रेस्कू ऑपरेशन बाबत उपस्थितांना माहिती दिली.
   यावेळी सावंतवाडी वनविभाग मानद वन्यजीव रक्षक नागेश दप्तरदार, कुडाळ वनक्षेत्रपाल संदीप कुंभार, विमानतळ व्यवस्थापक कुलदीप सिंग, मठ वनपाल सावळा कांबळे, मठ वनरक्षक सूर्यकांत सावंत, तुळस वनरक्षक विष्णू नरळे आदी उपस्थित होते.कुलदीप सिंग यांनी मान्यवराचे स्वागत केले.