माघी गणेश जयंतीनिमित्त नवाबाग येथे भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन.

माघी गणेश जयंतीनिमित्त नवाबाग येथे भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन.


        नवाबाग ग्रामस्थांकडून बायुला घुमटेश्वर मंदिर येथे माघी गणेश जयंती उत्सव आयोजित करण्यात आला आहे. यादरम्यान दि.१ फेब्रुवारी रोजी सिंधूरत्न ढोलताशा पथकाच्या गजरात गणरायाचे आगमन पूजन नंतर दु.१२ वा. आरती व तीर्थप्रसाद, सायं. ४ वा. सातेरी महिला वारकरी मंडळ (अणसूर) यांचे भजन, सायं. ५ वा. रामेश्वर महिला वारकरी मंडळ (वेंगुर्ला) यांचे भजन, सायं. ७ वा. नवाबाग ग्रामस्थांची संगीत आरती, रात्रौ ८ वा. लकी ड्रॉ कुपन स्पर्धा, रात्रौ ९.३० वा. नटराज प्रॉडक्शन प्रस्तुत, विश्व कलामंच निर्मित नृत्य, हास्य विनोदाचा कलाविष्कार, दि.२ रोजी पहाटे ५ वा. काकड आरती, स. ९ वा. नवाबाग ग्रामस्थांचे वारकरी भजन, दुपारी १२.३० वा.महाप्रसाद, दु. ३ वा. फुगडी व हळदीकुंकू, सायं. ६ वा. विसर्जन अशा कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तरी सर्व भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
     त्याचबरोबर फक्त २० रूपयांत  लकी ड्रॉ कुपन स्पर्धा ठेवण्यात आली आहे. यातील आकर्षक भरघोस बक्षिसे मिळवण्यासाठी जास्तीत जास्त कुपन खरेदी करा, असे आवाहन नवाबाग ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे. लकी ड्रॉ कुपन हितेश तांडेल (७२४९२६९०७६), देवेंद्र केळुसकर (हॉटेल साई माऊली, मानसीश्वर मंदिर नजिक) येथे उपलब्ध आहेत.