आंबोली सैनिक स्कूलचा वर्धापनदिन उत्साहात संपन्न

आंबोली येथील सैनिक स्कूलचा २१ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला. यावेळी शाळेच्या गुणवंत विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रशालेच्या 'वेध' या वार्षिक विशेषकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी लेफ्टनंट कर्नल तनुज मंडलिक व सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी संस्था कार्यकारी अध्यक्ष सुनील राऊळ, संचालक ऑ. कॅप्टन दिनानाथ सावंत, जॉय डॉन्टस, राजाराम वळंजू, सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर, ऑ. कॅप्टन सुभाष सावंत, कार्यालयीन सचिव दिपक राऊळ, श्रीकांत गावडे प्रमुख गावकर, सुभेदार मेजर बाळकृष्ण गावडे, चौकुळ माजी सैनिक बापू गावडे सैनिक स्कूलचे माजी मुख्याध्यापक सुरेश गावडे, सामाजिक कार्यकर्ते विजय नार्वेकर, पालक प्रतिनिधी संजय गावडे, सौ. संजना पेडणेकर, सौ. कीर्ती समजिस्कर, कलंबिस्त हायस्कूलचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव पत्रकार विजय राऊत, अनिल चव्हाण सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, आंबोली ग्रामस्थ, समस्त पालक वर्ग व पंचक्रोशीतील आजीमाजी सैनिक बांधव व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.