इन्सुली जि. प. शाळा क्र. ६ मध्ये वृक्षारोपण; २७ रोपांची लागवड

इन्सुली जि. प. शाळा क्र. ६ मध्ये वृक्षारोपण; २७ रोपांची लागवड

सावंतवाडी

 

     पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत जि. प. शाळा क्र. ६ येथे शाळा व्यवस्थापन समिती, पालक संघ आणि माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांच्या हस्ते एकूण २७ झाडांची लागवड करण्यात आली.मुख्याध्यापिका सौ. श्रावणी सावंत, सहशिक्षिका सौ. राधिका परब तसेच शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते २५ पोफळी, एक नारळ आणि एक तमालपत्र अशा एकूण २७ रोपांचे रोपण करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शैलेश पालव, ग्रामपंचायत सदस्य स्वागत नाटेकर, इन्सुलीचे माजी सरपंच नंदू पालव, माजी विद्यार्थी संघाचे सचिव चंद्रशेखर मुळीक, मुंबईस्थित माजी विद्यार्थी देवू सावंत, माजी विद्यार्थी संजय तावडे, गोविंद पालव, ग्रामस्थ, मुख्याध्यापिका, सहशिक्षिका तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले.