शिरोडा गावचे माजी सरपंच राजन गावडे यांचे निधन

शिरोडा गावचे माजी सरपंच राजन गावडे यांचे निधन

 

वेंगुर्ला 


         शिरोडा गावचे माजी सरपंच, जिल्हा बँकेचे माजी सदस्य तथा शिरोडा सोसायटी विद्यमान चेअरमन राजन गावडे यांचे गोवा बांबुळी येथे उपचारादरम्यान निधन झाले. शिरोडा गावाच्या विकासात्मक वाटचालीत त्यांचा मोलाचा वाटा होता. नुकत्याच झालेल्या श्री देवी माऊली सहस्त्रचंडी अनुष्ठान सोहळ्याच्या नियोजनात ते सक्रिय होते. आमदार दीपक केसरकर यांचे अत्यंत विश्वासू साथीदार म्हणूनही त्यांची ओळख होती. शिरोडा येथील शासकीय ठेकेदार तथा शिवसेना विभागप्रमुख अमित गावडे यांचे ते वडील होत.