न्हावेली गावात शैक्षणिक क्रांतीचे पाऊल; चिमुरड्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप 

न्हावेली गावात शैक्षणिक क्रांतीचे पाऊल; चिमुरड्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप 

 

न्हावेली

 

     नूतन शैक्षणिक वर्षाचे स्वागत करत न्हावेली (चौकेकरवाडी) येथील 'श्री देवी माऊली युवक कला क्रीडा सेवा मंडळाने' या वर्षीही आपली सामाजिक बांधिलकी अविरत जपली आहे. मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक हरीष जयदेव धाऊसकर यांच्या विशेष व अमूल्य सौजन्याने गावातील जिल्हा परिषदेच्या ४ शाळा आणि ४ अंगणवाड्यांमधील चिमुरड्यांना शैक्षणिक साहित्याचे दिमाखात वाटप करण्यात आले.हा स्तुत्य उपक्रम पंचायत समिती सदस्य शरद जयदेव धाऊसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पार पडला.या प्रसंगी उपस्थित चिमुरड्यांना मार्गदर्शन करताना मान्यवरांनी सांगितले की, “मुलांचे शिक्षण हीच गावातील खरी संपत्ती आहे. ग्रामीण भागातील मुलांपर्यंत शिक्षणाची साधने पोहोचवणे हे प्रत्येक घटकाचे कर्तव्य आहे." मंडळाने घेतलेला हा पुढाकार गावातील शैक्षणिक प्रगतीला नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.नूतन वर्षाच्या सुरुवातीलाच मिळालेल्या या शैक्षणिक भेटीमुळे चिमुरड्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. या कार्यक्रमाला मिळालेला ग्रामस्थांचा प्रचंड प्रतिसाद न्हावेली गावाच्या एकजुटीची आणि शैक्षणिक जागरूकतेची साक्ष देतो.दरवर्षी सामाजिक भान ठेवून अशा विविध उपक्रमांचे आयोजन करणाऱ्या श्री देवी माऊली युवक कला क्रीडा सेवा मंडळाचे अध्यक्ष, सचिव आणि सर्व सदस्यांचे या सुंदर आयोजनाबद्दल न्हावेली गावातील ग्रामस्थांसह संपूर्ण पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.