वायंगणी येथे २० मार्च रोजी  श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा

वायंगणी येथे २० मार्च रोजी  श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा

 

मसुरे

 

  श्री स्वामी समर्थ मठ वायंगणी येथे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळ्या निमित्त २० मार्च रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी ५ वा. दुग्ध अभिषेक, सकाळी ७.३० वा. नित्य आरती, सकाळी ९.०० वा. अभिषेक, सकाळी ११.०० ते सायं. ६.०० वा. स्थानिकांची भजने दुपारी १२.३० वा. महाआरती, दुपारी १.०० वा. महाप्रसाद, रात्रौ ठिक ०८.०० वा. श्री आकारी ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ चिंदर गावठणवाडी यांचे ट्रिकसीन युक्त, भक्तीमय दिंडीनृत्य. बुवा भाई तावडे, पखवाजवादक प्रथमेश तावडे, तबलावादक तेजस घाडी. उपस्थितीचे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ वायंगणी अध्यक्ष दिपक सुर्वे, कार्याध्यक्ष चंद्रकांत हडकर, सरचिटणीस सुनील खरात, उपाध्यक्ष दिनेश साळकर, चिटणीस कल्याण साळकर, खजिनदार प्रफुल्ल माळकर, सदस्य रामदास प्रभू, श्री. पंडित खोत, सुधीर घागरे, सविता राणे यांनी केले आहे. ज्या स्वामी भक्तांना महाप्रसाद सेवेत वस्तू किंवा देणगी स्वरुपात सहभागी व्हायचे असेल त्यांनी मठातील सेवेकऱ्यांशी संपर्क साधावा.
रुपेश राणे 9511827951.