वेंगुर्ला उभादांडा येथील वृद्धाचा सागरेश्वर समुद्रकिनारी आढळला मृतदेह

वेंगुर्ला
वेंगुर्ले तालुक्यातील सागरेश्वर समुद्रकिनारी ६० वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उभादांडा, सिद्धेश्वरवाडी येथील रॉकी डियोग फर्नांडिस, वय ६० वर्षे हे शुक्रवारी सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी समुद्र किनारी गेले होते. सायंकाळी उशिरा ते समुद्रकिनारी निपचीत पडलेल्या स्थितीत दिसून आले. त्यामुळे स्थानिकांनी त्यांना उचलून उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला येथे दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात डियोग रॉकी फर्नांडिस यांनी दिलेल्या तक्रारी नुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास हेड कॉन्स्टेबल योगेश राऊळ करीत आहेत.