वेंगुर्ले आगारात १० फेब्रुवारी रोजी प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन

वेंगुर्ले
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ रा.प. सिंधुदुर्ग परिवहन विभागामार्फत सोमवार दि. 10 फेब्रुवारी रोजी राज्य परिवहन महामंडळाच्या वेंगुर्ला आगारात "प्रवासी राजा दिन" व "कामगार पालक दिन" साजरा करण्यात येणार आहे.वेंगुर्ले तालुक्यातील प्रवासी बांधव-भगिनींनी या प्रवासी दिन कार्यक्रमास वेंगुर्ले बस स्थानक येथे उपस्थित रहावे असे आवाहन वेंगुर्ले आगार व्यवस्थापक राहुल कुंभार यांनी केले आहे.