जिल्हात अंधश्रध्दा निमुर्लनाचे काम करणाऱ्या इच्छुक व्यक्तींनी १५ ऑक्टोंबर पर्यंत अर्ज सादर करावेत.

जिल्हात अंधश्रध्दा निमुर्लनाचे काम करणाऱ्या इच्छुक व्यक्तींनी १५ ऑक्टोंबर पर्यंत अर्ज सादर करावेत.

सिंधुदुर्ग.

   जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार  कार्यक्रम अंमलबजावणी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्याबाबत उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सपन्न झाली. शासन निर्णयामध्ये निर्देशित केलेप्रमाणे जिल्हास्तरीय समिती गठित करणे आवश्यक असून या समितीमध्ये समन्वयक 1 व अशासकीय सदस्य 7 असणे आवश्यक असल्याचे नमूद आहे.
  या समितीमध्ये जिल्हा समन्वय व अशासकीय सदस्य यांची निवड करण्यासाठी जादुटोणा विरोधी कायदा अंतर्गत प्रचार व प्रसार करण्यासाठी जिल्ह्यामधील अंधश्रध्दा निमुर्लनाचे काम करणाऱ्या इच्छुक व्यक्तीकडून दि. 15 ऑक्टोंबर 2023 अखेर सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,सिंधुदुर्ग या कार्यालयाकडे अर्ज स्विकारण्यात येत असल्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त समाज कल्याण सिंधुदुर्ग दूरध्वनी  02362 2288882 क्रमांकावर संपर्क साधावा.