राजा शिवछत्रपती परिवार या संस्थेकडून किल्ले सिंधुदुर्ग येथे स्वच्छता मोहिम

सिंधुदुर्ग
राजा शिवछत्रपती परिवार ही गडकिल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्रात 22 जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे. यांच्या मार्फत रत्नागिरी विभागातर्फे किल्ले सिंधुदुर्ग येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आलेली.यात गडावरील वाढलेले गवत तसेच खुरटी झाडे- झुडुपे काढण्यात आली. या मोहिमेला रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग तसेच गोवा राज्य या ठिकाणचे बहुसंख्य मावळे आणि रणरागिणी उपास्थित होते. या संस्थेकडून प्रत्येक महिन्यातील एक रविवार हा शिवकार्यासाठी देण्यात येतो.
जर कुणाला या मोहिमेत सहभागी व्हायचे असल्यास संपर्क करावा, असे आवाहन रत्नागिरी विभाग प्रमुख श्री.दिनेश कुर्टे यांच्याकडून करण्यात आले आहे.