श्री क्षेत्र कुणकेश्वर दीपोत्सव २०२५ चे आयोजन

श्री क्षेत्र कुणकेश्वर दीपोत्सव २०२५ चे आयोजन

 


देवगड 


     देवगड ट्रस्ट कुणकेश्वर यांच्या वतीने यंदाही दीपावली पाडवा निमित्त श्री क्षेत्र कुणकेश्वर दीपोत्सव मोठ्या भक्तिभावात व सांस्कृतिक उत्साहात साजरा होणार आहे. हा उत्सव बुधवार, २२ ऑक्टोबर २०२५ रोजी सायं. ६ वाजता सुरू होईल. मंदिर परिसरात २१ हजार पाणत्यांची आरास, रांगोळी प्रदर्शन व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.मुख्य आकर्षण म्हणून “स्वर श्रीपाद” संगीत मैफिलीत गायक श्रीपाद जांबळेकर, करिश्मा शेटकर व साईश नाईक सादरीकरण करणार आहेत. दीपोत्सवाचे विविध कार्यक्रम रात्री ९:३० वाजेपर्यंत पार पडणार असून, ट्रस्टतर्फे सर्व भक्तांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.