लहानग्यांच्या हस्ते अंगणवाडीत आनंदी दिवाळी साजरी
परुळे
परुळे येथील अंगणवाडी कर्ली येथे लहानग्यांनी रंगीबेरंगी रांगोळ्या काढून, दिवे लावून आणि सुंदर आकाशकंदील बन वून उत्साहात दिवाळी साजरी केली. या प्रसंगी मुलांना फराळ वाटप करून आनंद साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात अंगणवाडी सेविका विनया बोवलेकर, मदतनीस सौ. तुळसकर तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच अंगणवाडी भोगवे येथेही मुलांनी आनंदी वातावरणात दिवाळी साजरी केली. बालपणापासून आपल्या सण-उत्सवांची ओळख मुलांना व्हावी, यासाठी अंगणवाडीतून विविध उपक्रम राबविले जातात. सुट्टीपूर्वी सर्वांनी एकत्र दिवाळी साजरी करून सणाचा आनंद घेतला.

konkansamwad 
