नौसेना दिन पूर्णत्वास नेण्यासाठी बांधकाम विभागाची मोठी मेहनत : कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड.
सिंधुदुर्ग.
४ डिसेंबर हा 'नौसेना दिन मालवण राजकोट येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जवळपास २५ कि. मी लांबीचे डांबरीकरण करण्यात आले तर १०० कि. मी. लांबीचे रस्ते सुस्थितीत करण्यात आले या नौसेना दिनानंतर राजकोट आणि परिसर पर्यटन नकाशावर झळकला असून कार्यक्रमानंतर सुमारे २५ हजारसून अधिक पर्यटकांनी याठिकाणी भेट दिली आहे यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण याच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाने जी मेहनत घेतली, त्याबद्दल संरक्षणमंत्र्यांपासून ते मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांनीही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर यांचे विशेष अभिनंदन केल्याचे सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी सांगितले.नौदल दिनाच्या निमित्ताने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जवळपास १०० कि मी. लांबीचे रस्ते सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून पांढरे पड़े, कैटाआईज बोर्ड लावून रस्ते सुरक्षित करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज हे आरमाराचे प्रमुख हाते. परकियांचे आक्रमण थांबविण्यासाठी शिवाजी महाराजांनी मालवण येथे किल्ल्याची निर्मिती केली. याच पार्श्वभूमीवर नौसेना विभाग आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौसेना मालवण येथे पहिल्यांदा साजरा केला ही बाब सिंधुदुर्ग जिल्हयासाठी मोठी कौतुकाची अणि अभिमानाची आहे, असेही सर्वगोड यांनी सांगितले.छत्रपती शिवाजी महाराज यांनी मालवण येथे राजकोट किल्ला बांधला परंतु किल्ल्याचे काही अवशेष शिल्लक नव्हते. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राजकोट किल्लाची पुनर्बाधणी करण्यात आली याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा परकीय आक्रमण थोपवण्यासाठी युद्धाच्या अवशेषात पश्चिमेकडील मुख असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला. या पुतळ्याची उंची २८ फूट, चबुतराची उंची १५ फूट आहे. तसेच पुतळ्यासाठी २ कोटी व ४४ लक्ष खर्च आला आहे. पुतळा व पुतळ्याच्या चबुतराचे बांधकाम नौसेना व विभागामार्फत करण्यात आलेले आहे. मात्र, यासाठी लागणारा निधी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दिला आहे.
राजकोट किल्ल्यावर राज्य शासनाच्या मालकीची ३३ गुंठे जागा उपलब्ध होती. जो सदरची जागा जिल्हाधिकारी किशोर तावडे र यांनी तात्काळ राज्य शासनाकडून प्रस्ताव म युद्धपातळीवर मंजूर करून घेऊन ही जागा न सार्वजनिक बांधकाम विभागकडे वर्ग केली व आवश्यक कार्यवाहीही केली. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी निधीची तरतूद केली. किल्ल्याचे बांधकाम सार्वजनिक बांधकाममार्फत अवघ्या दोन महिन्यात विक्रमी वेळेत दर्जेदार व उत्कृष्टरित्या पूर्ण केलेले आहे. यामुळे मालवण व राजकोट किल्ला जगाच्या नकाशावर अधोरेखित निश्चितपणे झाला आहे.५ डिसेंबरपासून हजारोंच्या संख्येने लोक राजकोट व छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन प्रेरणा, स्फूर्ती घेण्यासाठी येत आहेत. राजकोट किल्ल्यामुळे मालवण शहराच्या व जिल्हयाच्या वैभवामध्ये भर पडली आहे. यातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आर्थिक स्रोत तसेच दरडोई उत्पन्न निश्चितपणे वाढीस लागणार आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या कामांचे कौतुक होत आहे. या प्रकल्पात आपणाला काम करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो, असेही सर्वगोड यांनी सांगितले.