नेमळे येथे थार गाडी दरीत कोसळली...महिलेसह चौघे जखमी
सावंतवाडी
झाराप-पत्रादेवी महामार्गावर नेमळे-एरंडकवाडी येथे थार गाडी १५ फुट खोल दरीत कोसळून अपघात झाला आहे. यात एका महिलेसह अन्य ४ जण जखमी झाल्याचे समजते. दरम्यान महामार्गावर अपघात घडल्यानंतर १०८ रुग्णवाहिका तात्काळ येणे गरजेचे होते. मात्र अनेक वेळा फोन लावून सुद्धा रुग्णवाहिका येण्यास वेळ होत असल्यामुळे ठाकरे सेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते घटनास्थळी उपस्थित आहेत. मदत कार्य सुरू आहे.
konkansamwad 
