कुडाळ पिंगुळी येथे रेस्क्यू बोटचे उद्घाटन

कुडाळ
कुडाळ तालुक्यातील पिंगुळी खोडदेश्वर मंदिर येथे रेस्क्यू बोटचे उद्घाटन कुडाळ नायब तहसीलदार जाधव यांच्या हस्ते करण्यात आले असून मालवण रेस्क्यु टीमने सर्व ग्रामस्थ व कर्मचारी यांना विशेष मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच अजय आकेरकर, मंडळ अधिकारी गुरव, पोलीस पाटील सतिश माडये, बाबली पिंगुळकर, ग्रामपंचायत सदस्य शशांक पिंगुळकर, महेश पालकर, मंगेश मसगे, बंड्या पिंगुळकर, ग्रा.प. कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.