मनसेच्या निवेदनाची दखल.....पोलिस अधीक्षक डॉ. दहीकर यांची दोडामार्ग पोलीस स्टेशनला भेट

मनसेच्या निवेदनाची दखल.....पोलिस अधीक्षक डॉ. दहीकर यांची दोडामार्ग पोलीस स्टेशनला भेट

दोडामार्ग

 

      महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी दोडामार्ग पोलीस स्टेशनला भेट देऊन तालुक्यातील विविध समस्या आणि वाढत्या गुन्हेगारीबाबत निवेदन दिले होते. त्याची तातडीने दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांनी आज दोडामार्ग पोलीस स्टेशनला भेट दिली. या भेटीत डॉ. दहीकर यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था, वाहतूक कोंडी, पर्यटन स्थळांवरील वाढता बेधुंदपणा आणि इतर प्रश्नांबाबत सविस्तर माहिती घेतली.पर्यटन स्थळांवर विशेष बंदोबस्त वाढविणे, वाहतूक नियमनासाठी तातडीने उपाययोजना करणे आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गस्त वाढविण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.मनसेने दिलेल्या निवेदनाची तातडीने दखल घेऊन पोलीस अधीक्षकांनी भेट दिल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.