एसटी कर्मचाऱ्याच्या सतर्कतेने चोरी टळली,भाजपाने केला सत्कार

एसटी कर्मचाऱ्याच्या सतर्कतेने चोरी टळली,भाजपाने केला सत्कार

कुडाळ

 

      नेरूर येथील एस टी कर्मचारी प्रशांत गावडे यांनी एका महिलेची सोनसाखळी चोरणाऱ्या परप्रांतीय इसमास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. यासाठी त्यांचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. फलाटावर लागलेल्या कुडाळ - मालवण एसटी बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची गर्दी झाली होती. त्या गर्दीचा फायदा उठवत एक संशयित इसम बसमध्ये चढणा-या युवतीच्या गळ्यातील सोनसाखळी तोडण्याचा प्रयत्न करत होता. प्रशांत गावडे यांनी सतर्कता दाखवत त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.सत्कार समारंभात जेष्ठ कार्यकर्ते राजू राऊळ, उपसभापती तुकाराम तेली, निलेश तेंडुलकर, जयेश चिंचळकर, चारुदत्त देसाई, मंगेश प्रभू, दिनेश शिरवळकर, सचिन काळप, निलेश परब, सुनील बांदेकर, मुक्ती परब, श्रावण शिरसाठ व शशिकांत आरोलकर उपस्थित होते.