ओसरगाव टोल नाक्यावर महामार्ग पोलिसांची धडक कारवाई.....मद्यधुंद टेम्पो चालकावर गुन्हा दाखल

ओसरगाव टोल नाक्यावर महामार्ग पोलिसांची धडक कारवाई.....मद्यधुंद टेम्पो चालकावर गुन्हा दाखल

सिंधुदुर्ग


     महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी महामार्ग पोलीस मदत केंद्र रत्नागिरी विभागाकडून आज अचानक नाकाबंदी करण्यात आली. पोलीस निरीक्षक दीपाली जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली 17 जून 2026 रोजी सायंकाळी 6 ते 7 या वेळेत ओसरगाव टोल नाका येथे केलेल्या कारवाईत एका मद्यधुंद टेम्पो चालकावर मोटार वाहन अधिनियम कलम 185 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत ग्रेटर मुंबई येथील 44 वर्षीय वाहन चालक रवि विशंकर भोला सिंग याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या EICHER TEMPO MH04KF6535 या वाहनाची तपासणी केली असता अल्कोहोलचे प्रमाण 101.9mg/100ml आढळले. हे प्रमाण कायदेशीर मर्यादेपेक्षा कित्येक पटीने जास्त असल्याने चालकावर तात्काळ कारवाई करण्यात आली.सदर वाहन चालकाला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आले.पोलीस निरीक्षक दीपाली जाधव यांच्यासह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश गवस, पोलीस अंमलदार विजय बिर्जे, नितीन शेट्ये, सागर परब, रवि इंगळे, पांडुरंग खपडकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला.यंदा चालू महिन्यात महामार्ग पोलिसांनी एकूण 5 मद्यपी वाहन चालकांवर कारवाई केली आहे. प्रत्येकी 10,000 रुपये प्रमाणे एकूण 50,000 रुपये दंड न्यायालयात भरणा करण्यात आला आहे. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांविरोधात कारवाईत सातत्य राहणार आहे, असा इशारा पोलीस निरीक्षक दीपाली जाधव यांनी दिला आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महामार्ग पोलिसांकडून अशा प्रकारच्या नाकाबंद्या नियमितपणे केल्या जातील.