राष्ट्रवादी काँग्रेसची तालुका बैठक वेंगुर्ला येथे संपन्न; संघटना बळकटीवर भर
वेंगुर्ला
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची वेंगुर्ला तालुका मासिक बैठक शनिवार दि. ४ जुलै २०२६ रोजी दुपारी १२:३० वाजता राऊळवाडा पेट्रोल पंपाजवळील वेंगुर्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात संपन्न झाली.बैठकीसाठी प्रदेश चिटणीस सुरेश गवस प्रमुख उपस्थित होते. त्यांनी पक्षाच्या संघटना वाढीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवणे आणि आगामी काळातील राजकीय वाटचालीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी वेंगुर्ला तालुका अध्यक्ष संदीप पेडणेकर, जिल्हा उपाध्यक्ष एम. डी. सावंत, सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदय भोसले, जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे, कुडाळ तालुका अध्यक्ष आर. के. सावंत, जिल्हा उपाध्यक्ष सुशील चमणकर, दोडामार्ग तालुकाध्यक्ष मेघेंद्र देसाई, ओबीसी उपाध्यक्ष चंद्रशेखर मांजरेकर, तालुका सरचिटणीस संदीप सातार्डेकर, तालुका सचिव सचिन कोंडये, युवा तालुका अध्यक्ष गजानन कुंभार, सिद्धेश परब यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.बैठकीत पक्ष संघटन, सदस्य नोंदणी, स्थानिक प्रश्न आणि आगामी कार्यक्रमांवर चर्चा करण्यात आली.
konkansamwad 
