परुळे येथील राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत समर्थ कलाविष्कार ग्रुप देवडची मशाल प्रथम.

परूळे युवक कला क्रीडा मंडळ आयोजित स्व.ॲड. अभयकुमार देसाई स्मृती प्रित्यर्थ राज्यस्तरीय ३४ एकांकिका स्पर्धा घेण्यात आली. ज्यामध्ये श्री समर्थ कलाविष्कार ग्रुप देवडची मशाल प्रथम,
व रंगयान नाट्य संस्था, इचलकरंजी चरचणाऱ्या फँटसीचे युद्ध व्दितीय व गायन समाज देवल क्लब कोल्हापूर यांची अल्मोर डेड तृतीय, सांघिक उत्तेजनार्थ नाटक नाटकवेडे, रत्नागिरी विठाई, प्रेक्षकप्रिय एकांकिका मुख्तलीफ थेटर कोल्हापूर यांची - निर्भर यांची निवड करण्यात आली. वैयक्तिक पारितोषिके- पुरुष अभिनय - प्रथम क्रमांक अभिनव कुरणे (चरचणाऱ्या फँटसीचे युद्ध), द्वितीय- दिपक जानकर (मशाल), तृतीय विशाल दुराफे (ओळखी दृष्टी पुणे), स्त्री अभिनय - प्रथम - सानिका कुटे (ऑफलदिन), व्दितीय जानवी जाधव (चारू) तृतीय प्राजक्ता नेरुडकर (जापसाल), दिग्दर्शन- प्रथम - विजय कदम (मशाल),
द्वितीय - कांदबरी माळी (चरचरणाऱ्या फँटसीचे युद्ध) तृतीय - प्रमोद पुजारी (अलमोष्ट डेड) प्रकाश योजना - प्रथम शेखर मूळे (निर्झर), संगीत संयोजन - प्रथम - अनुपान दाभाडे (अलमोन्ट डेड), नेपथ्य प्रथम - श्री समर्थ कलाविष्कार देवगड (मशाल), सर्वोत्कृष्ट विनोदी भूमिका - साहिल दिलीप जाधव (मशाल), समाजप्रबोधनपर एकांकिका निर्मिती थिएटर्स, कुडाळ ऑफलाईन निवड करण्यात आली.
पारितोषिक वितरण सोहळ्यास परूळे सरपंच प्रणिती आंबडपालकर, डॉ. उमाकांत सामंत, ॲड.प्रमोद देसाई, आदिनारायण देवस्थान अध्यक्ष सचिन देसाई, उपाध्यक्ष आनंद देसाई, अविनाश देसाई, पत्रकार भूषण देसाई आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्वा नाईक यांनी केले व प्रास्ताविक प्रथमेश नाईक आणि अजित परूळेकर यांनी केले.