सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धा २ व ३ जुलै रोजी.

सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धा २ व ३ जुलै रोजी.

सिंधुदुर्ग.

   जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे दि. 2 ते 3 जुलै रोजी जिल्हास्तरीय आंतरशालेय सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धा वा.स. विद्यालय माणगाव मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून 2024-25 सत्रातील आंतरशालेय प्रवेश स्पर्धाचा शुभारंभ होणार  असल्याची माहिती  जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली आहे.
   सुब्रतो मुखर्जी स्पोट्स एज्युकेशन सोसायटी, नवी दिल्लीतर्फ 2024-25 या वर्षातील सबज्युनिअर व ज्युनियर गटातील 63 व्या आंतरराष्ट्रीय सुब्रतो मुखजों चषक फुटबॉल स्पर्धेचा कार्यक्रम संचालनालयाला प्राप्त झाला. 17 वर्षाखालील मुला-मुलीच्या गटाची राष्ट्रीय स्पर्धा 30 जुलै ते 11 सप्टेंबर दरम्यान दिल्ली येथे होणार आहे.
   यावर्षी सबज्युनिअर म्हणजे 14 वर्षाखालील मुलांची स्पर्धा यावर्षी 15 वर्षांखालील मुलांच्या गटात होणार असून राष्ट्रीय स्पर्धा बंगळूरू येथे घेण्यात येणार आहे. त्यामुळे क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे जिल्हास्तरीय व विभागीय सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धा 10 जुलैपूर्वी घेण्यात येणार आहेत. जे संघ सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणार आहेत अशा सर्व संघांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागापूर्वीच www.subrotocup.in या संकेतस्थळावर खेळाडू व संघाची नोंदणी करणे अनिवार्य आहे. अशा नोंदणीकृत संघानाच या स्पर्धेमध्ये सहभागी करुन घेण्यात येईल. जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धा 2 ते 3 जुलै दरम्यान बा.स. विद्यालय माणगाव मैदानावर होणार आहे. सबज्युनियर म्हणजे 15 वर्षांखालील मुलांच्या गटात 1 जानेवारी 2010 किंवा त्यानंतर जन्मलेल्या आणि ज्युनिअर म्हणजे 17 वर्षांखालील मुलामुलीच्या गटात 1 जानेवारी 2008 किंवा त्यानंतर जन्मलेल्या खेळाडूंना सहभागी होता येईल. जिल्हास्तरीय स्पर्धेनंतर विभागीय आणि राज्यस्तरीय सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धा घेण्यात येणार आहे. राज्यस्तरीय स्पर्धेतील विजेत्या संघाला राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. जिल्हास्तरीय आंतरशालेय सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धेत सहभागी शाळांना 30 जूनपर्यंत प्रवेश निश्चित करता येईल, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली आहे.