घोणसरी येथिल श्री विठ्ठल रखुमाई मंदिर सभागृह दुरुस्ती कामास आम राणे यांच्या माध्यमातून मंजूरी माजी सभापती मनोज रावराणे यांचे विशेष प्रयत्न.

घोणसरी येथिल श्री विठ्ठल रखुमाई मंदिर सभागृह दुरुस्ती कामास आम राणे यांच्या माध्यमातून मंजूरी  माजी सभापती मनोज रावराणे यांचे विशेष प्रयत्न.


कणकवली
       घोणसरी गावातील खवळेभाटले वाडीतील श्री विठ्ठल रखुमाई मंदिराच्या सभागृहाचे छप्पर मोडकळीस आले होते. मंदिराच्या सभागृहाची दुरुस्ती व्हावी ही वाडीतील ग्रामस्थांची गेली कित्येक वर्षांची मागणी होती. यासंदर्भात स्थानिक तसेच मुंबईस्थित सभासदांनी वारंवार हे काम व्हावे अशी मागणी केली होती. याची दखल घेत कणकवली तालुक्याचे माजी सभापती तथा भाजपा विधानसभा प्रमुख मनोज रावराणे यांनी विशेष प्रयत्न करून आमदार नितेशजी राणे  यांच्या माध्यमातून २५१५ योजनेअंतर्गत ५ लाख रुपये निधी मंजूर झाला.
         या कामाचा शुभारंभ घोणसरी गावचे विद्यमान उपसरपंच श्री. प्रसाद राणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सौ.दीप्ती कारेकर, माजी सरपंच श्री.कृष्णा एकावडे, श्री.दीपक एकावडे,भाजपा बूथ अध्यक्ष संजय शिंदे, संतोष एकावडे, विजय एकावडे, उमेश राऊत, मुंबई मंडळाचे सह सेक्रेटरी महेश एकावडे, अशोक कारेकर, प्रभाकर साप्ते, जयप्रकाश मोरे, दिगंबर एकावडे, अशोक परब, सीताराम होबळकर, गणेश एकावडे तसेच महिला सभासद ही उपस्थित होते.
      यावेळी नवनिर्वाचित घोणसरी ग्रामपंचायत उपसरपंच श्री.प्रसाद राणे व ठेकेदार मिहिर मराठे, श्री.विजय मेस्त्री यांचा मंडळाच्या वतीने शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
     तसेच गेली कित्येक वर्षं रखडलेले काम पूर्ण होणार असल्यामुळे ग्रामस्थांनी आमदार मान.श्री.नितेशजी राणे व माजी सभापती श्री.मनोज रावराणे यांचे विशेष आभार मानले.
       यावेळी माजी सरपंच कृष्णा एकावडे यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नितीन पारकर यांनी केले तर आभार माजी सरपंच दीपक एकावडे यांनी मानले.