आजगाव येथे सायबर क्राईम जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

आजगाव येथे सायबर क्राईम जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न


सावंतवाडी 
        सावंतवाडी येथील आजगाव, धाकोरे व भोमवाडी यांचा एकत्रित ग्रामसंवाद कार्यक्रम सिंधुदुर्ग पोलीस दलातर्फे वाचनालय हॉल आजगाव (मराठी शाळा) येथे संपन्न झाला. यामध्ये सायबर क्राईम डायल 112 तसेच 1930 ची जनजागृती व नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. यावेळी पोलीस उपनिरीक्षक, शिरोडा दुरक्षेत्र ठाणे अमलदार आणि संबंधित पोलीस यंत्रणा यांनी आपले मार्गदर्शन केले. 
        यावेळी पोलीस दूरक्षेत्र शिरोडा अमलदार हडकर, पोलिस वेंगुर्लेकर, दीपा मठकर, परुळेकर, अण्णा झांटये, मटकर गुरुजी,  आजगाव सरपंच श्रीम. सौदागर, भोमवाडी सरपंच श्रीम. वाडकर, धाकोरा उपसरपंच श्री. गवस, आजगाव ग्रामसेवक, धाकोरे ग्रामसेवक, परब हायस्कूल प्राचार्य श्री. बागेत, पोलीस पाटील आजगाव निकिता पोखरे, धाकोरे पोलीस पाटील श्रीराम प्रभू रेडकर, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कृषी अधिकारी सर्व सदस्य व कर्मचारी तसेच गावातील नागरिक शाळा हायस्कूल यामधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, आरोग्य अधिकारी व  कर्मचारी, एम. एस. ई. बी. चे अधिकारी व कर्मचारी राजकीय पुढारी, बँकचे अधिकारी व कर्मचारी, खाजगी संस्थांचे अधिकारी, गावातील ज्येष्ठ नागरिक तसेच गावातील महिला बचत गटातील सर्व सदस्य महिला या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.