तांबळडेग खाडीत मासेमारीला गेलेल्या मच्छीमाराचा पाण्यात बुडून मृत्यू
देवगड
तालुक्यातील तांबळडेग खाडीत पागाने मासेमारी करण्यासाठी गेलेल्या एका मच्छीमाराचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी पहाटे घडली. जतीन चंद्रकांत कोचरेकर वय 45, रा. तांबळडेग, मधलीवाडी असे मृत मच्छीमाराचे नाव आहे.पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जतीन कोचरेकर हे रविवारी पहाटे सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास तांबळडेग-मोर्वे खाडीत पागाने मासेमारीसाठी गेले होते. मासेमारी करत असतानाच ते पाण्यात बुडाले.त्यांचा मृतदेह रविवारी सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास तांबळडेग-मोर्वे खाडीच्या संगमाजवळ आढळून आला.या प्रकरणी सुरेशदेव विश्वनाथ सारंग रा. तांबळडेग, मधलीवाडी यांनी देवगड पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गावडे करीत आहेत.
konkansamwad 
