तुळस जैतीर देवस्थानचे मानकरी सुभाष परब यांचे निधन

वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यातील तुळस गावचे रहिवासी व आंबा बागायतदार आणि जैतीर देवस्थानचे मानकरी सुभाष यशवंत परब (वय ७६) यांचे राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन विवाहित मुली, भाऊ, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे वेंगुर्ला तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांचे वडील होत, तर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या योगिता परब यांचे ते सासरे होते. कै. सुभाष परब हे वेंगुर्ले पंचायत समितीचे माजी सदस्य तसेच खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन व तुळस ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच होते.