वेतोरे येथे सायबर सिक्युरिटी व अमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान

वेतोरे येथे सायबर सिक्युरिटी व अमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान

वेंगुर्ला

 

     श्री देवी सातेरी हायस्कूल व कै. सौ. गुलाबताई दिनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालय, वेतोरे येथे सायबर सिक्युरिटी व अमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियानांतर्गत विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे मार्ग, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर आणि अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.कार्यक्रमाला वेंगुर्ले पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री. शेखर दाभोलकर सर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना सायबर फसवणूक, ऑनलाईन व्यवहारातील धोके आणि व्यसनाधीनतेपासून दूर राहण्याचे महत्त्व पटवून दिले.तसेच MKCL च्या वतीने हायटेक कॉम्प्युटर, वेंगुर्ला यांच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा, पासवर्डचे संरक्षण, फिशिंग आणि इतर ऑनलाईन धोक्यांबाबत मार्गदर्शन केले.शाळा-महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी या जनजागृती कार्यक्रमाला उपस्थित होते.