वेंगुर्ला पोलिसांची धडक नाकाबंदी; वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई

वेंगुर्ला पोलिसांची धडक नाकाबंदी; वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई

वेंगुर्ला

 

    जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर व अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार, वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली मानसीश्वर मंदिरासमोरील वेंगुर्ला–शिरोडा मार्गावर विशेष नाकाबंदी करण्यात आली.या नाकाबंदी दरम्यान येणाऱ्या-जाणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. मोटार वाहन अधिनियम, 1988 अंतर्गत वाहन परवाना (लायसन्स) जवळ नसणे, वाहन विमा (इन्शुरन्स) नसणे, हेल्मेटचा वापर न करणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणे (ड्रिंक अँड ड्राइव्ह) आदी विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक योगेश राठोड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अर्जुन गवस, वाहतूक अंमलदार मनोज परुळेकर, अमित आवळेगावकर, महिला पोलीस हवालदार स्नेहा गवस तसेच महिला पोलीस मंगल मोखरे यांनी सहभाग घेऊन यशस्वीरीत्या पार पाडली.वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन वेंगुर्ला पोलिसांकडून करण्यात आले आहे.