गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी दोघे ताब्यात.....स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई....दारूसह १ लाख ४ हजाराचा मुद्देमाल जप्त.
बांदा
बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दोघांवर कारवाई केली आहे. यात दारू वाहतूक करणाऱ्या सह त्याच्या मालकाचा समावेश आहे. या कारवाईत दुचाकीसह १ लाख ४ हजार चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शामसुंदर सोनू कांबळे (वय ५४, रा. सातोळी-हरिजन वाडी) आणि दारूचा मालक जॅकी सेलेस्टीन डिसोझा (रा. माडखोल-फुगेवाडी) अशी त्या दोघांची नावे आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाकडून बांदा येथे केली. ही कारवाई गुन्हे अन्वेषण शाखेचे एएसआय सदानंद राणे, पोलीस हवालदार डॉमिनिक डिसोजा, गोसावी आणि जॅक्सन यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली असून, बांदा पोलीस ठाण्यात या संदर्भात पुढील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
konkansamwad 
