ईद-ए-मिलाद निमित्त कणकवलीत मुस्लिम विकास मंचतर्फे सरबत वाटप

ईद-ए-मिलाद निमित्त कणकवलीत मुस्लिम विकास मंचतर्फे सरबत वाटप

कणकवली


      मुस्लिम विकास मंच, सिंधुदुर्ग यांच्या वतीने ईद-ए-मिलाद निमित्त कणकवली येथील आप्पासाहेब पटवर्धन चौकात सरबत वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमातून सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि एकोप्याचा संदेश देण्यात आला.यावेळी मुस्लिम विकास मंच, सिंधुदुर्गचे अध्यक्ष निसार शेख, सचिव अॅड. अशफाक शेख, खजिनदार शानू शाह यांच्यासह अस्लम शेख, अमजद शेख, लतीफ खान, इबू शेख, इम्रान शेख, सलमान शेख, तौशिफ शेख, सलीम शेख, सर्फराज शेख, इरफान खोत, कमाल खान, तौशिफ बागवान, मुजफ्फार शेख, मुन्ना शेख, निसार काझी, अस्लम निशानदार, गुलाब धारवाडकर, रियाज शेख, एजाज शेख, जाकीर भाई, राजू खान, कादर शाह आदी उपस्थित होते.दरम्यान, ईद-ए-मिलादच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, भाजपा तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, कणकवली पंचायत समितीचे उपसभापती सोनू सावंत, मराठा समाजाचे पदाधिकारी सुशील सावंत, भाई परब तसेच हरकुळ गावचे नवनिर्वाचित तंटामुक्ती अध्यक्ष राजू पेडणेकर आदींनी सदिच्छा भेट दिली.ईद-ए-मिलादच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध समाजातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे सामाजिक ऐक्य व बंधुभावाचे वातावरण निर्माण झाले.