गाडीवरचा ताबा सुटल्याने मळगाव येथे अपघात

गाडीवरचा ताबा सुटल्याने मळगाव येथे अपघात

 

न्हावेली

 

   कुडाळ वरून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या चारचाकी गाडीच्या चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला.रस्त्यावर कुत्रा आडवा आल्याने गाडीची धडक दुभाजकाला बसून गाडी पलिकडच्या मार्गावर येऊन कोसळली. या अपघातात चालकासह गाडीतील प्रवासी बचावले. यात गाडीच्या दर्शनी भागासह डावीकडील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर मळगाव जोशी मांजरेकरवाडी सर्कल लगत या चारचाकी गाडीचा अपघात झाला. गाडीसमोर कुत्रा आडवा आल्याने अचानक ब्रेक लावल्याने गाडी थेट दुभाजक ओलांडून दुसऱ्या बाजूच्या रस्त्यावर जाऊन कोसळली. सुदैवाने या अपघातात चालकासह गाडीतील प्रवाशांना मोठी दुखापत झाली नाही. मात्र, गाडीच्या दर्शनी भागासह डावीकडील बाजूचे मोठे नुकसान झाले आहे.