कोकण भजन रत्न प्रकाश पारकर बुवा यांच्या हस्ते ६० भजनी बुवांचा सत्कार

मुंबई गोराई येथील विठ्ठल मंदिराच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित ६ जुलै रोजी नामवंत ६० भजनी बुवांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. गोराई विठ्ठल मंदिर आणि श्री विठ्ठल रखुमाई चॅरिटेबल ट्रस्टचे हे रौप्य महोत्सवी वर्ष याचे औचित्य साधून ६ जुलै रोजी हा सत्कार सोहळा होणार आहे देवशयनी आषाढी एकादशीचे औचित्य साधत. नामवंत भजनीबुवा व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये 60 भजनीबुवांचा समावेश आहे. या बुवांचा कोकण भजन रत्न पुरस्काराने सन्मानित असलेल्या प्रकाश पारकर बुवा यांच्या हस्ते सत्कार सोहळा संपन्न होणार आहे. तरी या सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन श्री विठ्ठल रखुमाई चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष यांच्याकडून करण्यात आले आहे.