कुडाळ येथील साळुंखे कुटुंबीयांना माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मदतीचा हात.

कुडाळ येथील साळुंखे कुटुंबीयांना माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मदतीचा हात.

कुडाळ.

  शहरातील कुडाळेश्र्वरवाडी येथील शिवशक्ती कॉम्प्लेक्स मध्ये राहणाऱ्या साळुंखे कुटुंबास माजी खासदार निलेश राणे यांनी एक लाखाची आर्थिक मदत सुपूर्द केली. श्रीकांत साळुंखे (वय ६० वर्ष) हे शिवशक्ती कॉम्प्लेक्स कुडाळेश्वर वाडी,  येथील रहीवाशी आहेत.त्याना 'गुलियन बेरी सिंड्रोम (जीबीएस) या आजाराचे निदान करण्यात आले.हा आजार अतिशय दुर्मिळ असल्यामुळे त्यांच्या उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीची गरज होती.त्यांचे उपचार मणिपाल हॉस्पिटल, गोवा येथे सुरू आहे. हॉस्पिटलने १२-१५ लाखावर खर्च होईल असे सुचित केले होते त्यामुळे साळुंखे कुटुंबीयांनी मदतीसाठी नीलेश राणे यांना एका पत्राद्वारे विनंती केली होती.पत्राचा मान ठेवून भाजप नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या माध्यमातून नीलेश राणे यांनी १ लाखाचा धनादेश साळुंखे यांच्या कुटुंबांना सुपूर्द केला.यावेळी तहसीलदार गोसावी यांनी माजी खासदार निलेश राणे व पाठपुरावा केल्याप्रकरणी अभिषेक गावडे  यांचे आभार मानले.
   यावेळी भाजप नगरसेवक अभि गावडे, माजी नगरसेविका अश्विनी गावडे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश राऊळ, माजी तहसीलदार शरद गोसावी, पवार,गवंडे, सौ गव्हाणकर, सौ भोगटे आदी उपस्थित होते.