आंतरराष्ट्रीय योग दिन विशेष

योग म्हणजे केवळ व्यायाम नव्हे, तर तन, मन आणि आत्म्याचा एकत्रित संगम आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत योगाला अनन्यसाधारण महत्त्व असून प्राचीन काळामध्ये ऋषीमुनींनी योगसाधनेद्वारे मानवाला आरोग्य, शांती आणि आत्मसाक्षात्काराचा मार्ग दाखवला आहे. 21 जून रोजी साजरा होणारा आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरातील लोकांना योगाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि योगप्रति जनजागृती वाढवण्यासाठी सुरू करण्यात आला. या दिवशी सूर्य सर्वात जास्त आकाशात असतो, म्हणून हा दिवस योग आणि अध्यात्मासाठी विशेष मानला जातो. मोदींनी 2014 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव मांडला आणि 177 देशांनी त्याला पाठिंबा दिला.आज जगभरात योग दिवस साजरा केला जातो आणि योग हा जागतिक चळवळ बनला आहे. असे मोदी म्हणतात.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शब्दातून योगाचा संदेश अत्यंत सुंदर आणि प्रभावीपणे व्यक्त होतो. योग हा भारताची संस्कृतिक ओळख, जागतिक आरोग्याचा संदेश आणि मानवतेच्या एकतेचा सेतू आहे. त्यांच्या प्रेरणादायी विचारांमुळे योग दिवस आज जगभरात उत्साहाने साजरा केला जातो.योग हा केवळ शरीराची लवचिकता नव्हे, तर मनाची स्थिरता आणि आत्म्याची शांती आहे. योगामुळे आपण स्वतःला आणि समाजाला सकारात्मकता दिशा देऊ शकतो. त्याचबरोबर ध्यान हा योगाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग असून ध्यानामुळे मनाची चंचलता कमी होते, अंतर्मन शुद्ध होते आणि तणाव, चिंता, भीती यांवर नियंत्रण मिळवता येते. रोज काही मिनिटे ध्यान केल्याने मानसिक स्वास्थ टिकून राहते, विचारशक्ती वाढते आणि जीवनात सकारात्मकता येते. मानवाच्या आयुष्यात योग केवळ एक विद्या नव्हे, तर एक विज्ञान आहे. योग आपल्याला आपल्या अंतःकरणाशी, आपल्या चेतनेशी जोडतो. योग आपल्याला जीवनमात्राच्या एकतेची जाणीव करून देतो आणि प्राणीमात्राशी प्रेम करण्याचा आधार देतो. म्हणूनच आपल्यातील अंतर्विरोध अडथळे, आणि प्रतिरोध दूर करण्यासाठी योगाचा मार्ग स्वीकारावा लागतो. ''एक भारत, श्रेष्ठ भारत" ही भावना जगासमोर ठेवण्याचा योग हा सर्वोत्तम मार्ग आहे.
प्रभात वाऱ्यावर गंध दरवळतो
योगाच्या श्वासात नवा दिन उजळतो
मन शांत देह लवचिक
सूर्यनमस्कारात हरवतो दिन चकचक
श्वासांचे सूर, ध्यानाची छाया
मनात उमटते सुखाचा दिन नवी माया
आसनांची लय, शरीराची शांती
योगात सापडतो आनंदाचा दिन अनंती
संपते चिंता, हरवतो थकवा
योगाच्या संगतीत मिळतो दिन नववा
आरोग्य, समाधान, स्फूर्तीची किनार
प्रत्येक योग दिन असो आनंदाचा साज शिवार