सेवा शक्ती संघर्ष संघटनेच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी भरत चव्हाण यांची निवड, कुडाळमध्ये भव्य सत्कार
कुडाळ
सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी वेंगुर्ला आगाराचे भरत चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल सेवाशक्ती संघर्ष समितीच्या वतीने कुडाळ वेताळ बांबर्डे तेली समाज हॉल येथे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. या निमित्ताने संवाद मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते.यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, उपाध्यक्ष निलेश तेंडुलकर, उपाध्यक्ष बाळू देसाई, कुडाळ आगार अध्यक्ष जयेश चिंचळकर, केंद्रीय कार्यकारणी कोषाध्यक्ष रामचंद्र मुंडे, पुणे प्रदेशाध्यक्ष अमोलजी तांबेकर, कोल्हापूर मीडिया प्रमुख कमलाकर अत्राम, आजरा आगार सहसचिव रोहित गबाले, भाजपा कामगार मोर्चा संयोजक व संघटनेचे सल्लागार अशोक राणे, वेंगुर्ला उपनगराध्यक्ष सुहास गावंढळकर, माजी जि प सदस्य भारती चव्हाण, भाजपा कार्यकर्ते शैलेश जामदार यांच्यासह भरत चव्हाण यांचे कुटुंबीय उपस्थित होते.गोट्या सावंत म्हणाले की, आपण मनुष्य आहोत त्यामुळे 100 टक्के काम करणे शक्य नसले तरी जेवढे शक्य आहे तेवढे कामगारांसाठी करू. राज्यात आणि देशात आपली सत्ता असल्याने संघटनेचे प्रश्न निश्चित सुटतील. कर्मचाऱ्यांनी चांगले काम करावे, अडचण आल्यास संघटना पाठीशी उभी राहील. भरत चव्हाण यांना हे पद कोणत्याही शिफारशीने मिळालेले नाही तर संघटना वाढीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानामुळे मिळाले आहे. त्यांना केंद्रीय कार्यकारणीवर घेतल्याबद्दल त्यांनी संघटनेचे संस्थापक आमदार गोपीचंद पडळकर यांचे आभार मानले.निलेश तेंडुलकर यांनी एसटीच्या सध्याच्या अवस्थेविषयी चिंता व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारने खरेदी केलेल्या लालपरी आणि जिजाऊ बसेस पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नांमुळे सिंधुदुर्गला मिळाल्याने चालक-वाहकांना दिलासा मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. सीएनजी बसेसमुळे वेळापत्रक कोलमडत असल्याने केंद्रीय कार्यकारिणीने त्यावर उपाययोजना कराव्यात, अशी सूचनाही त्यांनी केली. यावेळी बाळू देसाई आणि अशोक राणे यांनीही मार्गदर्शन केले. केंद्रीय कोषाध्यक्ष रामचंद्र मुंडे यांनी संघटनेच्या वाटचालीची माहिती दिली.सत्काराला उत्तर देताना भरत चव्हाण म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या साथीमुळेच मी सर्व आगारांमध्ये संघटना वाढवू शकलो. सिंधुदुर्ग विभागात कर्मचाऱ्यांसाठी चुकीच्या पद्धतीने काम सुरू आहे, त्यात सुधारणा व्हावी अशी अपेक्षा आहे. निवृत्त कर्मचारी आणि सल्लागार अशोक राणे यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या अडचणी सुटल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजा सामंत यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुडाळ आगारातील प्रशांत गावडे आणि दिनेश शिरवलकर यांच्या टीमने मेहनत घेतली.या संवाद कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध आगारांतील विभागीय कार्यकारी सदस्य, अध्यक्ष, सचिव आणि मोठ्या संख्येने चालक, वाहक, यांत्रिक व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.
konkansamwad 
