बांद्यात १ कोटी ३६ लाखांची दारू जप्त, एकजण ताब्यात

बांद्यात १ कोटी ३६ लाखांची दारू जप्त, एकजण ताब्यात

 

बांदा

 

       बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी पुणे येथील एकाला बांदा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून १ कोटी ३६ लाख ६० हजार ७१६ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भारत संदिपान जाधव (वय ३१, रा. पुणे) असे संशयताचे नाव आहे. ही कारवाई आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास बांदा पोलिसांकडून चेक नाका येथे करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की, बांदा चेक नाक्यावर वाहनांची तपासणी करत असताना अशोक लेलँड कंपनीचा १४ चाकी ट्रक मध्ये गोवा बनावटीची दारू आढळून आली. याप्रकरणी पुणे येथील भारत संदिपान जाधव याला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती नवमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली अप विभागीय अधिकारी सावंतवाडी घनश्याम आढाव यांच्या सूचनेप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, पीएसआय झंजुरणे, राजेश गवस, दादा परब, राजाराम कापसे, प्रसाद पाटील, रोहित कांबळे आदींच्या पथकाकडून करण्यात आली.