गडचिरोली पोलीसांनी १२ नक्षलवाद्यांचा केला खात्मा; सरकारकडून गडचिरोली पोलीसांना ५१ लाखांंचं बक्षीस जाहीर.

गडचिरोली पोलीसांनी १२ नक्षलवाद्यांचा केला खात्मा; सरकारकडून गडचिरोली पोलीसांना ५१ लाखांंचं बक्षीस जाहीर.

गडचिरोली.

   गडचिरोलीत नक्षलवाद्यांविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी या कारवाईत तब्बल १२ नक्षलवाद्यांना यमसदनी पाठवलं आहे. गडचिरोली पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे सरकारकडून त्यांना ५१ लाखांंचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.
   छत्तीसगढ सीमेजवळील वांडोली गावात १२ ते १५ नक्षलवादी तळ ठोकून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याच माहितीच्या पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले होते. जवळपास सहा ते सात पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक चालली. अखेर या कारवाईत आतापर्यंत १२ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि नक्षलवाद्यांच्या दैनंदिन वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. त्याचवेळी या चकमकीत C-60 कमांडोचे उपनिरीक्षक सतीश पाटील यांच्या डाव्या खांद्यावर गोळी लागली असून ते गंभीर जखमी झाले आहेत.
   कांकेर जिल्ह्यातील पोलीस छावणीतून त्यांना हेलिकॉप्टरच्या साहाय्याने गडचिरोली येथील बांदा कॅम्प येथे नेण्यात आले आहे. सध्या या जवानाचे प्राण धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. या कारवाईनंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेजवळ कांकेरमध्ये C 60 ने मोठं ऑपरेशन करून 12 माओवाद्यांना ठार केले. दिवसभर हे ऑपरेशन सुरू होतं. त्यांचे मृतदेह, ऑटोमॅटिक मशीन गण जप्त केले आहेत. एक सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल जखमी झाले आहेत. त्यांना नागपूरला उपचारासाठी हलविले आहे. हे ऑपरेशन गेल्या काही वर्षांतील सगळ्यात मोठं ऑपरेशन असल्याने गडचिरोली पोलिसांना 51 लाखांचे बक्षीस आणि पुरस्कार राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.