मुणगे तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी मनोज सावंत यांची निवड.
देवगड.
मुणगे येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदी मनोज सखाराम सावंत यांची निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेमध्ये हि निवड झाली.
मुणगे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच सौ साक्षी गुरव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेमध्ये तंटामुक्त समीतीचे पुर्नरचना करणे या विषयातर्गत. तंटामुक्त समितीची निवड करण्यात आली त्यामध्ये सरपंच सौ. साक्षी गुरव, उपसरपंच संजय घाडी, ग्रामसेवक एम्. जे. कुबल, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद सावंत, सौ अंजली सावंत, सौ निकिता कांदळगावकर, सौ रविना मालाडकर, सौ परिना नाटेकर, धर्माजी आडकर, दशरथ मुणगेकर, पोलीस पाटील सौ साक्षी सावंत, तलाठी सौ. वीणा मेहेंदळे, आरोग्य सेविका श्रीमती चराटकर, वीज वितरण प्रतिनिधी श्री गावकर, कृषी सहाय्यक महेश सोनार, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश फाटक, पत्रकार प्रतिनिधी विश्वास मुणगेकर, सामाजिक कार्यकर्ता प्रतिनिधी गोविंद सावंत, बचतगट प्रतिनिधी श्रीमती कामिनी परब, ग्रामस्थ प्रतिनिधी देवदत्त पुजारे, मनोज सावंत, सत्यवान पुजारे, अनिल धुवाळी, पुरुषोत्तम तेली, सुरेश बोरकर, आदीची निवड करण्यात आली. या मधून तंटामुक्त समितीचे तात्कालीन अध्यक्ष पुरुषोत्तम तेली यानी तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदी मनोज सावंत यांचे नाव सुचविले, यास ग्रामस्थातून अनुमोदन देण्यात आले. मनोज सावंत यांची तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदी निवड झाल्याचे जाहिर करुन यासभेमध्ये नवनिर्वाचित तंटामुक्त समिती अध्यक्ष मनोज सावंत यांचे सरपंच सौ साक्षी गुरव यानी अभिनंदन केले.