जिल्हा कोषागार कार्यालया तर्फे २१ डिसेंबर रोजी निवृत्तीवेतनधारकांसाठी मेळाव्याचे आयोजन.

जिल्हा कोषागार कार्यालया तर्फे २१ डिसेंबर रोजी निवृत्तीवेतनधारकांसाठी मेळाव्याचे आयोजन.

सिंधुदुर्ग.

    राज्य शासकीय निवृत्तीवेतधारकांसाठी 'पेन्शनर्स डे' औचित्य साधून 21 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा कोषागार कार्यालय सिंधुदुर्ग येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून निवृत्तीवेतनधारकांच्या समस्यांचे निराकरण यावेळी करण्यात येणार आहे. या मेळाव्यास जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी यांनी केले आहे.
   यावर्षी पेन्शनर्स डे साप्ताहिक सुट्टी च्या दिवशी येत असल्याने जिल्हा कोषागार कार्यालय, सिंधुदुर्ग येथे गुरुवार 21 डिसेंबर रोजी  विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. मेळाव्यासाठी  कोकण विभागाचे लेखा व कोषागारे सहाय्यक संचालक  रजनी केळकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार असून उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.तसेच निवृत्तीवेतनधारकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असून याचा लाभ जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांनी घ्यावा.