कुडाळ येथील पोखरण-बौद्धवाडी साकव प्रकल्पाला ग्रीन सिग्नल!

कुडाळ
कुडाळ तालुक्यातील पोखरण-बौद्धवाडी येथील साकव बांधकामासाठी समाजकल्याण विभागाने आमदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार रु. ५० लाख मंजूर केले आहेत.ग्रामस्थांच्या वर्षांनुवर्षांच्या मागणीनंतर हा प्रश्न आता मार्गी लागला आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, लवकरच बांधकाम सुरू होणार आहे. हा साकव पूर्ण झाल्यानंतर वाहतूक आणि दळणवळणाची समस्या कायमस्वरूपी सुटणार आहे.