उद्योजक व झाटये काजुचे मालक सुधिर झाटये यांचा भाजपा मध्ये प्रवेश.

उद्योजक व झाटये काजुचे मालक सुधिर झाटये यांचा भाजपा मध्ये प्रवेश.


   कुडाळ येथील महालक्ष्मी हॉलमध्ये पालकमंत्री रविंद्र चव्हाण  यांच्या उपस्थितीत तुळस - वेंगुर्ला येथील प्रसिध्द काजूउद्योजक श्री सुधीर झांटये यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला. पालकमंत्री रविंद्र चव्हाण व जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी त्यांना भाजपा जिल्हा उद्योग आघाडी संयोजक पदी नियुक्त केले. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त उद्योजक भाजपा मध्ये सामील करून घ्यावेत असे आवाहन केले. तसेच उद्योग आघाडीच्या वतीने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नारायणराव राणे साहेबांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन केले.
   यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.  प्रभाकर सावंत,  जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष श्री.  सुहास गवंडळकर, वेंगुर्ला महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सौ. सुजाताताई पडवळ  उपस्थित होते.