'एक पेड माँ के नाम' अंतर्गत अणसूर येथे १०० वृक्ष लागवड

वेंगुर्ले
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या “एक पेड माँ के नाम” या उपक्रमाच्या अनुषंगाने अणसूर कार्यक्षेत्रात विविध प्रकारची १०० झाडे लावण्यात आली. तसेच ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत आणखी १५० झाडांची लागवड करण्यात आली आहे.
सध्या बदलत्या हवामानाचा परिणाम सजीवसृष्टीसह इतर अनेक क्षेत्रांवर होत आहे. अशा परिस्थितीत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड हा प्रभावी उपाय ठरत असल्याचे मत ग्रामपंचायतीकडून व्यक्त करण्यात आले.या अभियानाचा शुभारंभ ग्रामपंचायत अधिकारी सायली सातोसे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच सत्यविजय गावडे, उपसरपंच वैभवी मालवणकर, सदस्य साक्षी गघडे, संयमी गावडे, वामन गावडे, सुधाकर गावडे, आशा सेविका अनुष्का तेंडोलकर, अंगणवाडी सेविका अनिषा गावडे, मदतनिस अन्नपूर्णा गावडे, आणि अकुंश तेंडोलकर आदी उपस्थित होते.