गुरे वाहतूक करणारा टेम्पो दोडामार्गात रोखला

गुरे वाहतूक करणारा टेम्पो दोडामार्गात रोखला

 

दोडामार्ग

 

       गोवा व महाराष्ट्र राज्यातून कर्नाटकात गुरे वाहतूक केली जात असतानाच दोडामार्ग शहरात अवैध गुरे वाहतूक करणारे कर्नाटक परवाना असलेले पाच टेम्पो गो रक्षक व हिंदुत्ववादी युवकांनी रोखले व तात्काळ पोलिसांना कळवून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले याबाबत पोलिस तपास करत आहे.या टेम्पोत एकूण १५ गुरांचा समावेश होता. सदर टेम्पोमध्ये गुरांना कोंडून भरण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणावर हिंदुत्ववादी युवकांनी गर्दी करत टेम्पो चालकांना जाब विचारत चांगलेच फैलावर धरले त्यानंतर पोलिस दाखल झाले व त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.