जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी एका दहशतवाद्याचा केला खात्मा.

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी एका दहशतवाद्याचा केला खात्मा.

श्रीनगर.

 जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये आज सोमवारी सकाळी सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला. येथे दोन ते तीन दहशतवादी लपल्याची शक्यता आहे. त्यांचा शोध सुरू आहे.
  रविवारी अरगामच्या जंगलात गोळीबाराचा आवाज ऐकू आला. यानंतर लष्कर आणि पोलिसांनी शोधमोहीम राबवली. सोमवारी सकाळी शोधमोहीम सुरू असताना दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. ठार झालेल्या दहशतवाद्याचा मृतदेह जंगलात पडला आहे. तो ड्रोनमधून दिसत होता. त्याची ओळख पटलेली नाही.
   16 जून रोजीच गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत बैठक घेतली. ज्यात त्यांनी अधिकाऱ्यांना दहशतवादाचा मुकाबला करण्याचे निर्देश दिले आणि दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा. 9 जूननंतर चार दहशतवादी हल्ले झाले आहेत जम्मू आणि काश्मीर मध्ये 9 जूनपासून रियासी, कठुआ आणि डोडा येथे चार ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले आहेत. यामध्ये नऊ यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता. तसेच केंद्रीय राखीव पोलिस दलाचा (सीआरपीएफ) एक जवान शहीद झाला. दरम्यान, एक नागरिक आणि सात सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत.