सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून उमेदवारांसाठी विनामूल्य प्रशिक्षण शिबिर

सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भरती प्रक्रियेसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांसाठी बँकेतर्फे विनामूल्य प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे.उमेदवारांना या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी बँकेकडून गूगल फॉर्म लिंक प्रसिद्ध करण्यात येणार असून, इच्छुकांनी आपले नाव तात्काळ नोंदवावे असे आवाहन करण्यात आले आहे.या परीक्षेसाठी होणाऱ्या मार्गदर्शन वर्गाचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा, तसेच बँकेची भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक रितीने राबविण्यात येणार असल्याचे अध्यक्ष श्री. मनीष दळवी यांनी स्पष्ट केले आहे. दळवी म्हणाले, “उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी न पडता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे आणि उत्तम गुणांसह मेरिटमध्ये स्थान मिळवावे.”
सदर प्रशिक्षण शिबिर पुढील आठवड्यापासून सिंधुदुर्गनगरी येथे सुरू होणार असून उमेदवारांमध्ये याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
स्थळ: सिंधुदुर्गनगरी
प्रारंभ: पुढील आठवडा
शुल्क: विनामूल्य
उमेदवारांना या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी बँकेकडून गूगल फॉर्म लिंक प्रसिद्ध करण्यात आली आहे ती खालीलप्रमाणे
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfbNu6Lft4lQY_7dnyjvHvws81Ec0RXmr9RSiKhlDC8xe4GIw/viewform?usp=header