विजयदुर्ग येथे विश्व हेलिअम डे उत्साहात साजरा.

विजयदुर्ग येथे विश्व हेलिअम डे उत्साहात साजरा.

देवगड.

   ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्यावर १८ ऑगस्ट १८६८ रोजी हेलियमचा शोध लागला तो या विजयदुर्ग किल्ल्यावर यामुळे हेलियम वायुचे पाळणाघर हे विजयदुर्ग आहे. आज १५ वर्ष या किल्ल्यावर हा जागतीक हेलियम डे साजरा केला जात आहे. जगात हेलियम डे साजरा होणारे विजयदुर्ग हे पहिले ठिकाण आहे. यामुळे या ऐतिहासिक वास्तूला विज्ञाची जोड आहे अशी प्रतिक्रिया माजी आमदार प्रमोद जठार यांनी विजयदुर्ग किल्ले येथे विश्व हेलिअम डे दिनाच्या दिवशी व्यक्त केली. महाराष्ट्र शासन, प्रायोजक सिंधुरत्न समृध्दी योजना समिती, विजयदुर्ग ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने विजयदुर्ग किल्ल्यामधील साहेबाचे ओटे या ठिकाणी पुष्प अर्पण करून व हवेत फूगे सोडून १५५ वा विश्व हेलियम डे साजरा करण्यात आला.
    या कार्यक्रमाला माजी आमदार प्रमोद जठार, विजयदुर्ग प्रभा सरपंच रियाज काझी, ग्रामसेवक ए. डी. वारे, माजी उपसभापती रविंद्र तिर्लोटकर, माजी पंचायत समिती सदस्या शुभा कदम, आरीफ बगदादी, पवन परूळेकर, रघुनाथ धुळप, ईतिहासप्रेमी राजेंद्र परूळेकर, गिर्ये सरपंच लता गिरकर, सौंदाळे सरपंच मनाली कामतेकर, शिडवणे सरपंच, माजी सरपंच प्रसाद देवधर, प्रदीप साखरकर तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते. यावेळी जठार म्हणाले, विज्ञानातील एका शोधाचा वाढदिवस तोही विजयदुर्ग या ठिकाणी होत आहे. विजयदुर्ग किल्ल्याचे वैज्ञानिक महत्व सर्व जगाला आज समजले आहे. मुलांनी विज्ञानाची पुस्तके वाचण्याची गरज आहे. विजयदुर्ग येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत लवकरच खगोल केंद्र, संग्रालय, लेझर शो उभारण्यात यावे यासाठी सिंधुरत्न समृध्दी योजना समितीकडे ५ कोटीचा प्रस्ताव दिला असून पुढील दोन वर्षात येथे नक्कीच खगोल केंद्र उभे राहील असा विश्वास दिला.
    डॉ. सुनिल आठवले यांनी यावेळी हेलियम वायुच्या शोधाविषयी लघुचित्रपटाव्दारे शालेय विद्यार्थ्यांना माहीती दिली. तसेच विजयदुर्ग येथे होणा-या संग्रालयात हेलियमच्या वायुविषयी असणारी कागदपत्रे, आंग्रेकालिन जहाच्या प्रतिकृती आणि विजयदुर्ग परिसरातील ऐतिहासिक वस्तू या संग्रालयात ठेवण्यात याव्यात अशी इच्छा व्यक्त केली. विजयदुर्ग प्राथमिक शाळेचे शिक्षक शीतल देवरकर यांनी यावेळी मूलांना हेलिअम वायूचा उगम, त्याचे सद्यस्थितीत फायदे याविषयी माहीती दिली. जागतिक हेलियम डे निमित्त विजयदुर्ग एस. टी डेपो ते विजयदुर्ग किल्ल्यापर्यंत ढोलताशांच्या गजरात व जय जवान जय कीसान, जय विज्ञान जय विज्ञान अशा घोषणा देत विजयदुर्ग येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विजयदुर्ग हायस्कूल, विजयदुर्ग प्राथमिक शाळा, विजयदुर्ग उर्दू शाळा, मुकुंदराव पाठक नर्सिंग कॉलेज देवगड विद्यालयाचे विद्यार्थी तसेच विजयदुर्ग, गिर्ये, पडेल येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल सारंग यांनी केले.