शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
सिंधुदुर्ग.
शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे दि. 15 ऑगस्ट 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार, दि. 15 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 08.45 वा. शासकीय विश्रामगृह, ओरोस येथून मोटारीने पोलीस परेड ग्राऊंड, सिंधुदुर्गनगरी कडे प्रयाण. सकाळी 09.04 वा. सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय, पोलीस परेड ग्राऊंड, सिंधुदुर्गनगरी, ता. कुडाळ येथे आगमन. सकाळी 09.05 वा. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ (स्थळ- सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय, पोलीस परेड ग्राऊंड, सिंधुदुर्गनगरी ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग). सकाळी 09.33. वा. पोलीस परेड ग्राऊंड, सिंधुदुर्गनगरी येथून मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस कडे प्रयाण. सकाळी 09.40 वा. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासमवेत जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद कार्यालय येथील उपोषणकर्त्यांची भेट. सकाळी 10.00 वा. जिल्हाधिकारी यांच्या समवेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांसमवेत चहापान व संवाद (स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस जि. सिंधुदुर्ग). सकाळी 10.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस येथून मोटारीने सावंतवाडीकडे प्रयाण. सकाळी 11.00 वा. बाजारपेठ नवरात्र उत्सव मंडळ, सावंतवाडीतर्फे आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या ठिकाणी भेट (स्थळ- आरपीडी हायस्कूल मैदान, सावंतवाडी बाजारपेठ, जयप्रकाश चौक, सावंतवाडी). सकाळी 11.30 वा. सावंतवाडी रिक्षा युनियनच्या स्टँड्स ना सदिच्छा भेट). दुपारी 12.00 वा. अर्जुन पुरस्कार विजेत्या कु. हिमानी परब यांची भेट (स्थळ- आरपीडी हायस्कूल, सावंतवाडी बाजारपेठ, जयप्रकाश चौक, सावंतवाडी). दुपारी 12.40 वा. सावंतवाडी येथून मोटारीने पारपोली कडे प्रयाण. दुपारी 01.00 वा. पारपोली येथे आगमन व राखीव. दुपारी 01.25 वा. पारपोली येथून मोटारीने चौकुळ कडे प्रयाण. दुपारी 02.00 वा. चौकुळ येथे आगमन व राखीव. सोईनुसार चौकुळ येथून मोटारीने गोवा कडे प्रयाण.