ठाकरे बंधू एकत्र आल्याच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत जल्लोष

सावंतवाडी
मराठीच्या मुद्द्द्यावर ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे हे एकत्र आल्याच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी ठाकरे शिवसेना आणि मनसेच्यावतीने एकत्र येऊन जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी फटाके लावून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.महाराष्ट्रातील मराठी माणसांसाठी हा आनंदाचा दिवस आहे. महाराष्ट्राच्या विकासाची ही नांदी आहे. राज्याच्या एकजुटीसाठी आम्ही जल्लोष साजरा करत असल्याची भावना ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी दिली. मनसे जिल्हाध्यक्ष अॅड.अनिल केसरकर म्हणाले, मुंबईत मराठी माणूस एकत्र झाला. सिंधुदुर्गात देखील ते झाले आहे. मराठी माणसाच्या वाटेला कोणी गेले की तो कसा पेटतो ते कळले असेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख मायकल डिसोझा म्हणाले, मराठी जनांचा हा आनंदाचा दिवस आहे. बाहेरील शक्ति राज्यात अतिक्रमण करू पहात असताना मराठी मनाचा विचार करून ठाकरे बंधू एकत्र आले अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. यावेळी ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड अनिल केसरकर, सेना तालुकाप्रमुख मायकल डिसोजा, मनसे तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, सावंतवाडी शहर अध्यक्ष अॅड. राजू कासकर, कट्टर शिवसैनिक शब्बीर मणियार, चंद्रकांत कासार, गुणाजी गावडे, आशिष सुभेदार, राजन पवार, रमेश गावकर, मळगाव विभाग अध्यक्ष राकेश परब, मिलिंद देसाई, सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष अतुल केसरकर, सिद्धेश आखेरकर, दिनेश मुळीक, श्रीराम सावंत आदी शिवसैनिक व मनसैनिक उपस्थित होते.