कुणकेश्वर येथे २२ ऑक्टोबरला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

कुणकेश्वर येथे २२ ऑक्टोबरला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

 

देवगड

 

        मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायत कुणकेश्वर आणि सुनीता शांताराम एज्युकेशन ट्रस्ट संचलित मुकुंदराव फाटक नर्सिंग कॉलेज देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच माजी आमदार प्रमोद जठार यांच्या विशेष प्रयत्नांतून २२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजता जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा कुणकेश्वर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील गरीब व गरजू रुग्णांसाठी कान, नाक, घसा तपासणी, सर्जिकल तपासणी (विशेषतः पुरुषांसाठी प्रोस्टेट ग्रंथी तपासणी), स्त्री रोग तपासणी (स्तन तपासणी, पॅप टेस्ट), जनरल तपासणी, इसीजी, तंबाखू सोडण्यासाठी समुपदेशन यावेळी जीवनसत्वे, कॅल्शियम, लोह तसेच वेदनाशामक औषधांचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये मुंबईतील नामांकित डॉक्टरांमार्फत ही तपासणी होणार आहे. तरी जास्तीत जास्त गरजूंनी या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी गणेश चव्हाण, रीना चव्हाण, अवनी परब यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.