दोडामार्ग येथे चार चाकी थेट ओहोळात

दोडामार्ग
समोरून भरधाव येणाऱ्या दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे आपल्या चार चाकीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट रस्त्यालगतच्या २० फूट खोल ओहोळात कोसळली. सुदैवाने गाडीचा मागचा दरवाजा तुटल्याने चालक त्यातून बाहेर पडला आणि किरकोळ जखमी झाला. साटेली-भेडशी येथील एक युवक आपल्या वॅगनार कारने दोडामार्ग शहरातून घरी जात असता शहराच्या तलावाजवळील वळणावर समोरून एक दुचाकी विरुद्ध दिशेने येताना दिसली. दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या घाईत चालकाने गाडी विरुद्ध दिशेला वळवली. मात्र यावेळी गाडीवरील नियंत्रण सुटले आणि रस्त्यावरून खाली उतरत तब्बल २० फूट खोल असलेल्या ओहोळात कोसळली. यात गाडीचे मोठे नुकसान झाले. अपघात इतका भीषण होता की गाडीचा मागचा दरवाजा तुटला. घटनेनंतर गाडीचे इतर दरवाजे लॉक झाले पण सुदैवाने तुटलेल्या मागच्या दरवाजातून चालक स्वतः बाहेर पडला.